आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी 40 हजार विद्यार्थ्यांची कलचाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीला बुधवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी राज्यभरातील ४० हजार १६० विद्यार्थ्यांची कलचाचणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. राज्यात बुधवारी सकाळी २३९० शाळांतील ४० हजार १६० विद्यार्थ्यांनी कलचाचणी परीक्षा यशस्वी केली आहे. या कलचाचणीत १४० प्रश्नांचा समावेश होता. 
 
त्यासाठी एक तासाचा अवधी निर्धारित करण्यात आला होता. या कलचाचणीद्वारे विद्यार्थ्यांचा कला, ललित कला, तंत्रज्ञान, वाणिज्य, कृषी आणि संरक्षण या विद्याशाखांतील कल तपासला जाणार आहे. राज्यातील सर्व माध्यमिक शाळांनी ३ मार्चपूर्वी कलचाचणी परीक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे अपेक्षित आहे, असेही पाटील म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...