आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Once Again Reve Party In Pune, Young Brigad Dancing With Barbala

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पुण्‍यात पुन्हा रेव्ह पार्टी, बारबालांसोबत तरूण बेधुंद थिरकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मद्याच्या नशेत, अमली पदार्थांच्या अमलाखाली डीजेच्या तालावर 12 बारबालांसोबत बेधुंद थिरकणार्‍या 35 तरुणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. लोणावळा शहराजवळील पवना धरण परिसरातील आपटी गेवंडे गावातील बंगल्यात बुधवारी पहाटेपर्यंत ही रेव्ह पार्टी चालू होती. पोलिसांनी छापा टाकून विदेशी मद्य, डीजे असे साहित्य जप्त केले आहे.

पकडलेल्यांची नावे
कुणाल शहा, विजय गोयल, राजू अग्रवाल, अनू जडेजा, दीपक भानुसाले, युवराज कुरूप, समील जोसेफ, मनोज सिंग, पवन शर्मा, नितीन भानुसले, विमल जोशी, हिरेन सुरफी आदी.


पार्टी कोठे
पवना धरण परिसरात गेवंडे गावात एका बंगल्यावर. मुंबईतील गोल्डी चोप्रा या व्यावसायिकाचा हा बंगला.


चित्र काय
पहाटे 1 वाजता धाड. दारू, ड्रग्जच्या नशेत डीजेच्या तालावर तोकड्या कपड्यांतील बारबालांसोबत तरुण नाचत होते.


मुली कोठून
बारबाला उत्तर प्रदेश, कोलकाता, गोवा व महाराष्ट्रातील होत्या. कान्हेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोपींची चाचणी झाली.

यापूर्वी सिंहगडच्या पायथ्याशी दोन रेव्ह पाटर्य़ांवर कारवाई झाली. पुणे-नगर रस्त्यावर माया हॉटेल व बारमधील पार्टीवर कारवाई झाली. शाळकरी मुलांची चिल्लर पार्टी राज्यभर गाजली.