आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मलनिस्सारण वाहिनीत साफसफाई करताना कंत्राटी कर्मचार्‍याचा गुदमरून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मलनिस्सारण वाहिनीत साफसफाई करताना असताना श्वास कोंडल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील 'ड' प्रभागच्या समोरील औंध राहटणी येथे आज (बुधवारी) सकाळी वाजता ही घटना घडली. भारत भीमराव डावकर  (35, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मृत कर्मचार्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहटणी येथे मलनिस्सारण वाहिन्यावारंवार तूंबत असल्याने त्यातील मैला काढण्याचे काम सुरू होते. सफाईसाठी कंत्राटी कामगार सकाळपासून काम करीत होते. भारत डावकर हे आपल्या एका सहकार्‍यासोबत वाहिनीत उतरले होते. वाहिनीत अचानक त्यांचा श्वास कोंडल्याने बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी भारत डावकर यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने औंध रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी डावकर यांना मृत घोषित केले. या प्रकरणी काळेवाडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

जीव धोक्यात टाकतात कंत्राटी कर्मचारी...
कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात टाकून नाले साफसफाईचे काम करतात. खोल गटारीत उतरतात. मात्र, महापालिका किंवा ठेकेदारांकडून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केली जात नाही. त्यांना सेफ्टी साहित्य दिले जात नाही. या घटनेनंतर तरी झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन आणि ठेकेदारांना जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...