आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणावळा: टायगर पॉईंट जवळील घुबड तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोणावळा येथील टायगर पाॅईंटजवळील घुबड तलावात बुडून एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. धवल विजयभाई परमार (वय- 24, रा. कादंबरी, विशाल हॉटेलसमोर अंधेरी कुर्ला रोड, मुंबई (ईस्ट) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज (गुरुवारी) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ह‍ी घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धवल परमार हा त्याच्या चार मित्र-मैत्रिणींसोबत टायगर पॉईंट येथील घुबड तलावाच्या धबधब्याचा खाली भिजण्याचा आनंद घेत होते. मस्ती सुरू असताना अचानक धवल परमार याचा पाय घसरला आणि तो थेट खड्ड्यात जाऊन पडला, त्याचा मित्र आणि मैत्रिणी मदत करू शकले नाहीत. त्यांनी आरडाओरड केली. शेजारील पर्यटक धावून आले मात्र खड्डा खोल होता तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने धवल यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर लोणावळा येथील शिवदुर्ग पथक आणि पोलिसांना बोलावण्यात आले.शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी धवलचा मृतदेह हा शोधला आणि बाहेर काढला. धवल याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...