आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One Man Recovered From Goa In The Connection To Dabholkar Murder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर हत्याप्रकरणी गोव्यातून एकजण ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी गोव्यातील फोंडा भागातून एका युवकाला ताब्यात घेतले. संदीप शिंदे (वय 31, रा. शिवाजीनगर, पुणे) असे या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आलेली नाही, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपासाधिकारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.


दरम्यान, बुधवारी डॉ. दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद, मुलगी मुक्ता यांच्यासह अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पौळ यांची भेट घेतली. डॉ. हमीद यांनी सांगितले की, आरोपींना अजूनही अटक केलेली नसल्याने आमची तीव्र नाराजी आहे. आमचा संशय काही धार्मिक संघटनांवर आहे, पण मी त्यावर काही बोलणार नाही कारण तो तपासाचा भाग आहे.