आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुणे विद्यापीठातील उत्तरपत्रिकाच्या फेरमूल्यांकनात घोटाळा करून नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याप्रकरणी पोलिसांनी सलीम माजीद शेख (रा. कोंढवा) या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एम.पिंगळे यांच्या न्यायालयाने त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या घोटाळ्यातील आरोपींची संख्या आता अकरावर गेली आहे.
यापुर्वी चतृश्रृंगी पोलिसांनी विद्यापीठातील फेरमूल्यांकन विभागाचे उपकुलसचिव, तीन कनिष्ठ लिपिक , ओमन देशाचे दोन विद्यार्थी यांच्यासह दहा जणांना अटक केली होती. त्यानंतर अकराव्या आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ऑ क्टोबर महिन्यात एका महाविद्यालयात पदवी परीक्षांसाठी डमी विद्यार्थी बसविणाºया रॅकेटचा सूत्रधार गौस शब्बीर शेख (40) याला अटक केली होती. त्याच्याकडील चौकशीत हे रॅकेट उघड झाले होेते.
सरकारी वकील ए.के. पाचरणे यांनी सांगितले की, यापूर्वी अटक केलेल्या तीन लिपिकांशी सलीम याचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. आरोपी व विद्यार्थी यांच्यामध्ये तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. त्याने आणखी किती जणांना पैसे दिले, याचा तपास पोलिसांनी करायचा आहे. दरम्यान, सलीम सध्या एका महाविद्यालयात लिपिक असल्याचे सांगितले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.