आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Tale Of Crises : Wife Last Relics Not Existed

एका महाप्रलयातील गोष्‍ट: पत्नीच्या अस्थीही उरल्या नाहीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उत्तराखंडमधील महाप्रलयामुळे कित्येकांनी आपले कुटुंबीय गमावले, जिव्हाळे हरवले.. असाच चटका लावणारा प्रसंग पुण्यातील निगडीच्या काटे कुटुंबीयांवर ओढवला आहे. चार धाम यात्रेसाठी गेलेल्या काटे दांपत्यापैकी आशा काटे यांचे यात्रेदरम्यान निधन झाले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या अस्थींचे दर्शनही कुटुंबीयांना घडू शकले नाही.


पिंपरी-चिंचवडलगतच्या निगडी यमुनानगर भागातील काटे दांपत्य केसरी टूर्सबरोबर चार धाम यात्रेला गेले होते. 15 जूनला 40 प्रवाशांसह केसरीची बस बद्रीनाथला निघाली. या काळात सर्व प्रवाशांचे हाल झाले. आशा यांना दम्याचा त्रास होऊ लागला, त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. पती यशवंत यांनी धीर धरत कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि अलकनंदा नदीच्या काठी आशाताईंवर अंत्यसंस्कार केले. मात्र, तेवढ्यात पाण्याचा प्रवाह वेगाने आला. त्यात अस्थीही वाहून गेल्या. कुटुंबीयांना आशाताईंचे अस्थिदर्शनही होऊ शकले नाही.