आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासामुळे चिघळताेय काश्मीरचा हिंसाचार - शिंदे यांची माेदी सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू, मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब यांना फाशी देताना अाम्ही सावधानता बाळगत शांततेने काम केले. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासाेबत चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याबाबत केंद्र सरकारने गाजावाजा केला. या सरकारला प्रसिद्धीच्या झाेतात राहण्याची सवय लागली आहे. यामुळेच काश्मीरमध्ये हिंसाचार चिघळत असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी साेमवारी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ अायाेजित वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे, खजिनदार चैत्राली चांदाेरकर उपस्थित हाेते.
शिंदे म्हणाले, अफजल गुरूला फाशी देताना काेणती परिस्थिती उद््भवू शकते याची खातरजमा आधीच करण्यात आली. त्यानुसार निमलष्करी दल, पाेलिसांना सूचित करण्यात अाले हाेते. त्यामुळेच ठरावीक भागात दाेन दिवस दगडफेकीच्या घटना साेडल्या तर काश्मीर खाेऱ्यात शांतता होती. दहशतवादी अबू जुंदाल याच्यावरही नेपाळच्या सीमेवर अाल्यापासूनच सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवले हाेते. भारतीय हद्दीत अाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सरकार म्हणून अाम्ही जबाबदारी पार पाडताना कधीही गवगवा केला नाही, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.

‘अामच्या लष्करातील एका सैनिकाचे शिर कापले तर पाकिस्तानची दहा शिरे घेऊन येऊ,’ असे मोदींनी सांगितले होते. मात्र, तसे काहीही हाेताना दिसत नाही. चीनची विमाने भारतीय प्रदेशात टेहळणी करतात हे सरकारचे अपयश अाहे. देशाचे सार्वभाैमत्व धाेक्यात येते तेव्हा सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे. काश्मीर प्रश्नावर चर्चा सुरू ठेवणे अावश्यक असल्याचे शिंदे म्हणाले.
वेगळा नकाेच : सुशीलकुमार
>उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढले असून दाेषींवर कडक कारवाई हाेत नाही. त्यामुळे कोणालाही पाेलिसांची भीती वाटत नाही ही चिंतेची बाब अाहे.
>इसिसचा धाेका सर्वांसमाेर असून नागरिकांनी त्याबाबत सजग राहिले पाहिजे. डाॅ. झाकीर नाईक यांच्यावरील अाराेपांबाबत अापल्या कार्यकाळात काेणताही अहवाल अाला नव्हता.
>सनातन संस्थेवर बंदीबाबतचा काेणताही प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अापणास दिला नव्हता.
>वेगळा विदर्भ न हाेता अखंड महाराष्ट्र नेहमी राहिला पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...