आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार संजय काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश; न्यू कोपरे गावठाण प्रकरण भोवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- खासदार संजय काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिले आहेत.  न्यू कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना मुदतीत सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यातआले आहेत. काकडे हे  काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार आहेत.

संजय काकडे यांच्याप्रमाणेच त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे, अशोक यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना न्यायालयाकडून देण्यात आले. या प्रकरणी प्रकल्पग्रस्त दिलीप मोरे (रा. शिवणे) यांनी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाकडून काकडे यांच्यासह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, अशी माहिती न्यू कोपरे गावठाण प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अ‍ॅड. सुरेखा वाडकर यांनी दिली.  
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...