सोलापूर- सोलापूह जिल्ह्यातील सांगोल तालुक्यातील वाडेगावात विहिरीचे काम असताना असताना क्रेन व विहिरीचा कडे ढासळून 8 मजूर गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 12 च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
40 फूट विहिरीचे काम सुरु होते. मंगळवेढा-सांगोलासारख्या दुष्काळी भागात शेतकरी उन्हाळाच्या काळात विहिरीचे खोदकाम करतात. या घटनेतील विहिरीचेही खोदकाम सुरु होते. मात्र, 8 मजूर 40 फूट खोल विहिरीत काम करीत असताना क्रेन कोसळली. याचबरोबर विहिरीचा कडेचा मोठा भागही विहिरीत कोसळला. त्यात खाली काम करीत असलेले 8 मजूर ढिगा-याखाली गाडल्याचे सांगितले जात आहे.विहीरीतील ढिगा-याच्या उपशाचे काम सुरु आहे. हे मजूर जिवीत आहेत की मृत अवस्थेत याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.