पुणे- सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याची पातळी कमालीची घटल्याने कोयनेतील 95 टक्के वीज उत्पादन करणारे प्रकल्प बंद पडल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजटंचाईचे चटके बसणार आहे.
शेतकरी पाऊस नसल्याने आधीच वैतागलेला असताना आता वीजही उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याने चिंताग्रस्त झाला आहे. जी काही थोडीफार पिके हातात आहेत ती सुदधा वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. परळीतील औष्णिक वीज उत्पादनही थांबले आहे. त्यामुळे राज्यात वीज निर्मिती घटली आहे. त्याचा परिणाम विजेच्या उपलब्धतेवर होणार आहे.
महावितरणने कोयना जलविद्युत केंद्रातील पाण्याचे नियोजन केले नसल्यानेच कोयनेतून अपेक्षाएवढी वीज उत्पादन करणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाअभावी कृषी पंपांचा वापर कमी होत असल्याने विजेच्या मागणीत वाढ महावितरणला अपेक्षित नाही. मात्र, जी वीज पुरविणे अपेक्षित आहे यावरही मोठा परिणाम होणार आहे.
दरम्यान, राज्यातील कोकण, रायगड व मुंबई पट्ट्यात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसात महाराष्ट्रभर पाऊस पडू शकतो असे हवामानखात्याने म्हटले आहे.
पुढे वाचा, राज्यावर पाणी टंचाईचे भीषण संकट...