पुणे- श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतकडे निघाली आहे. सोमवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दिवे घाट पार केले. यंदा वरूणराजाने अद्याप हजेरी लावली नसल्याने वारकरी विठोला पाऊस पडावा यासाठी साकडे घालत होते. याचबरोबर एक-एक दिवसाचा मुक्काम कमी करीत वारक-यांना विठोबाला भेटण्याचीही आस लागली आहे.
आज सकाळी पहाटे साडेसहा वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतकडे मार्गस्थ झाले. कुंजीरवाडी फाटा येथे काही वेळ विसावा घेऊन दुपारपर्यंत ही पालखी उरूळी कांचन येथे थांबेल. त्यानंतर सायंकाळी बुवाची वाडी येथून ती यवत येथील मुक्कामी स्थळी पोहचेल. तर, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडलाच आज मुक्कामी असेल. सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
पुढे पाहा, पालखीतील छायाचित्रे...