आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEWS @ MH: राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजित घोरपडे गृहमंत्री आबांच्या विरोधात लढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: आर आर पाटील)
सांगली- लोकसभा निवडणुकीनंतर अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाण्याची भाषा करत आहेत. कुंपणावर असलेल्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे असा सल्ला पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत देताच पक्षाचे नेते व माजी मंत्री अजित घोरपडे यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकला आहे. येत्या 10-15 दिवसात भाजपात अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वेळ मिळताच पक्षप्रवेशाची वेळ ठरविण्यात येणार असल्याचे कळते. तासगाव-कवठेमहांकळ विधानसभा मतदारसंघातून खुद्द गृहमंत्री आर आर पाटील यांच्याविरोधात उतरणार असल्याचे अजित घोरपडे यांनीच सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या रविवारी सांगलीत राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
या वेळी आर.आर. पाटील आणि जयंत पाटील या दोघांनीही कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. या वेळी अनेक पदाधिकार्‍यांनी पक्षाविषयीच्या तक्रारी जाहीरपणे बोलून दाखवल्या. पलूस-कडेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख यांनी 'काँग्रेसशी युती करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी राजकीय आत्महत्या करायची काय?,' असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विलास जगताप हे भाजपमध्ये जाणार आहेत. खासदार संजयकाका पाटील यांच्या संपर्कात असलेले सर्व नेते भाजपात दाखल होतील असे बोलले जात आहे. तसेच या सर्वांना आगामी विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधून कोणी पक्ष सोडून जाण्याची भाषा करत असेल तर त्यांनी खुशाल जावे. त्यांना कोणी अडवणार नाही. उगाचच कुंपणावर बसून पक्ष सोडण्याची भाषा करू नका. हिंमत असेल तर निघून जा असे स्पष्ट शब्दात सुनावताच घोरपडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे वाचा, अजित पवार उवाच...