आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर बोलणारा माणूस संग्रहालयातच दिसेल - ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘तंत्रज्ञानस्फोटामुळे नवी सांकेतिक संवाद पद्धत आपला भोवताल व्यापून टाकत आहे. यामुळे बोलीभाषा नष्ट होण्याचा धोका आहे. खरेच असे घडले तर बोलणारा माणूस यापुढे केवळ संग्रहालयातच पहायला मिळेल’, अशी भीती ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केली.

‘भाषेचा पूल माणसाने बांधला. त्या शब्दगंगेची तुलना फक्त आकाशगंगेशीच होऊ शकते. या आकाशगंगेत आता व्यत्यय येत आहेत. येत्या २५ वर्षांत जगातील सहा हजारपैकी चार हजार भाषा लुप्त होतील. ज्या उरतील त्यांची अवस्था लुळीपांगळी असेल’, अशा शब्दात डॉ. देवी यांनी भविष्यातील भाषिक धोक्याचे भाकित केले. ‘अभिव्यक्ती : आरंभ आणि अंत’ या विषयावर डॉ. देवी बोलत होते. ‘आपल्या प्राचीनतेपेक्षाही आधीच्या पिढीतील अभ्यासकांनी जे तत्त्वज्ञान दिले, त्यावर देशाचे मोठेपण आणि शहाणपण सिद्ध होत असते. लेखक, कलाकार, नाटककार आदींनी अभिव्यक्ती निर्माण केली आहे, त्या अभिव्यक्तीच्या अंताच्या क्षणापाशी आपण अालाे असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...