आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व साहित्य संमेलन अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विश्व मराठी परिषदेच्या वतीने इंडोनेशियातील बाली येथे घेतल्या जाणाऱ्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली. १० सप्टेंबर रोजी संमेलन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रमेश गोडबोले, प्रसाद पिंपळखरे, बापूसाहेब जगताप, रवींद्र पाटील आदी या वेळी उपस्थित होते. संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण या वेळी झाले. कॅप्टन गायकवाड यांनी सांगितले की, मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठान आणि विश्व मराठी परिषद गेली सहा वर्षे जागतिक स्तरावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...