आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लाइंड मेन्सचे पंड्या यांचे निधन, पद्मश्री पुरस्काराने झाला होता पंड्यांचा सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्वत: दृष्टिहीन असतानाही आपल्या अन्य दृष्टिहीन बांधवांना दृष्टी मिळवून देणाऱ्या पुणे अंधजन मंडळ आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे प्रमुख निरंजन पंड्या (७१) यांचे कर्करोगाने येथे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल २०१२ मध्ये पंड्या यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. निरंजन प्राणशंकर पंड्या यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४५ रोजी पुण्यात झाला. त्यांनी दृष्टिहिनांसाठी अमेरिकेत जाऊन निधी संकलनाचे काम केले. ‘टॉकिंग बुक लायब्ररी’ सुरू केली. त्यांच्या देसाई नेत्र रुग्णालयात ३ लाख ६७ हजार नेत्ररुग्णांना लाभ मिळाला. 
 
बातम्या आणखी आहेत...