आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Chefs Food Festivel Won\'t Organise Shiv Sena

पाकिस्तानी शेफचा फूड फेस्टिव्हल उधळून लावू, शिवसेनेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पाकिस्तानी गायक गुलाम अली, पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या कार्यक्रमांना विरोध करणाऱ्या शिवसैनिकांनी आता ७ नोव्हेंबरला पुण्यात आयोजित भारत-पाक फूड फेस्टिव्हल उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित या फेस्टिव्हलमध्ये भारत व पाकचे शेफ सहभागी होणार आहेत.

फूड फेस्टिव्हलचे आयोजक तहसीन पुनावाला यांच्या मते, भारत व पाकमधील गरीब मुलांच्या मदतनिधीसाठी हे आयोजन केले आहे. पाकमधील ५ नामांकित शेफ यासाठी आमंत्रित करण्यात आले असून सध्या त्यांच्या व्हिसाची प्रक्रिया चालू आहे. मात्र, शिवसेनेच्या विरोधानंतर पाकिस्तानी शेफने सरकारकडून सुरक्षेबाबत लेखी हमी मागितली आहे. आपण मुख्यमंत्र्यांना भेटून कार्यक्रमास सुरक्षेची मागणी करणार आहोत. आयोजन करण्यात अडचणी येत असल्या, तरी या वर्षी नक्कीच हा कार्यक्रम घेतला जाईल, असा दावाही त्यांनी केला.

पुढे वाचा.. आयोजक भावना भडकावणारे