आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यनगरीत दाखल झाला वैष्णवांचा मेळा; दर्शनासाठी भाविकांचा महापूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागलेल्या वैष्णवांचा महामेळा काल (सोमवारी) सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाला. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाने पुण्यात वातावरण निर्माण झाले असून लाखो वारक-यांच्या वावराने चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. दर्शनासाठी भाविकांचा महापूर लोटल्याचे चित्र पुण्यात दिसत आहे.

सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रथम तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यनगरीत आगमन झाले. त्यापाठोपाठ सातच्या सुमारास ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात प्रवेशली. दोन्ही सोहळ्याचे वारकरी एकमेकांसमोर येताच परस्परांना उरी भेट देत होते. पाया पडत होते. मार्गावरील चौकात वारक-यांचे खेळ रंगत होते. दोन्ही पालख्या रात्री उशिरा नाना पेठ आणि भवानी पेठेत मुक्कामास पोचल्या. मंगळवारी पालख्यांचा मुक्काम पुण्यात असून, बुधवारी पहाटे दोन्ही पालख्यांचे एकाचवेळी प्रस्थान होईल. हडपसरपर्यंत पालख्यांची वाटचाल एकत्रित असेल, त्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर-सोलापूरमार्गे लोणीकाळभोरकडे जाईल तर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवड मुक्कामी निघेल.

उद्धव ठाकरे- पाचपुते यांनी खेळली फुगडी
माऊलींच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ठाकरे यांनी माउलींच्या पादुकांची महापूजा केली. सुमारे अर्धा तास ते पालखीसोबत चालले. राष्‍ट्रवादीचे माजी मंत्री बबनराव पाचपुतेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी उद्धव व पाचपुते यांनी भजन करत फुगडीचाही आनंद लुटला. माउलींच्या पालखीने सोमवारी पहाटे आळंदीकरांचा निरोप घेतला आणि पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, वारीतील छायाचित्रे.