आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी सोहळा: पहिले गोल रिंगण बेलवडीत पडले पार! पाहा छायाचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बेलवडी येथे पार पडले. - Divya Marathi
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बेलवडी येथे पार पडले.
पुणे- संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बेलवडी येथे पार पडले. शुक्रवारी काटेवाडीत मेंढ्याचे पहिले गोल रिंगण झाले होते. दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवसाचा लोणंदमधील मुक्काम आटोपून तरडगावाकडे मार्गस्थ झाली. संत तुकारामांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे आहे तर माऊलींची पालखी तरडगावात विसावा घेईल.
रिंगण म्हणजे काय? काय असते गोल रिंगण-
आता कोठे धावे मन |
तुझे चरण देखिलिया ||१||
भाग गेला शीण गेला |
अवघा झाला आनदु ||२||
शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर थकल्या भागल्या वारकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खेळला जाणारा खेळ म्हणजे रिंगण. वारीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची रिंगणे होतात. गोल रिंगणात सर्वप्रथम महाराजांचा आणि मानाचा अश्व पालखी रथासोबत रिंगणात प्रदक्षिणा करून मध्यभागी येतात. पालखी रथातून उतरवून रिंगणाच्या मध्यभागी विराजमान होते. सर्व दिंड्यांतील टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी, पखवाजे, तुलसी व हंडा डोक्यावर घेतलेल्या महिला भगिनी यांचा रिंगणात प्रवेश होतो.
टाळकरी व पखवादे यांचे ‘ज्ञानोबा – तुकाराम’ गजर पालखीभोवती सुरु होते. रिंगणात सर्वप्रथम झेंडेकर्याचे रिंगण होते त्यांनतर अनुक्रमे तुळशी व हंडा डोक्यावर घेतलेल्या महिला भगिनी, पखवाजे आणि विणेकरी यांच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण होतात. सर्वात शेवटी मुख्य आकर्षण म्हणजे अश्वांचे रिंगण होते, यामध्ये महाराजांच्या अश्वामागे मानाचा अश्व धावतो अशी प्रथा आहे. या अश्वांच्या पालखीला पालखीला तीन प्रदक्षिणा झाल्यावर अश्व मध्यभागी जाऊन पादुकांचे दर्शन घेतात आणि अश्वांचे रिंगण संपन्न होते हे रिंगण चालू असताना आणि झाल्यावरही मध्यभागी उडीचा खेळ, फुगडी झिम्मा, वारकऱ्यांचे मनोरे असे सांप्रदायिक खेळ खेळले जातात.
अश्वांच्या पावलांनी पुनित झालेल्या या रिंगणाच्या मैदानातील माती कपाळी लावण्यासाठीही वारकऱ्यांची लगबग सुरु होते. काही वारकरी ही माती आपल्या शेतात टाकण्यासाठी घेऊन जातात. यामुळे शेतातील पिकाची भरभराट होते ही यामागची श्रद्धा आहे. पालखी सोहळ्यात बाभूळगावकर यांचा आणि मोहिते पाटील (अकलूज) यांचे मानाचा अश्व असतात. वरील अभंगाच्या ओळींप्रमाणे सगळा शीण विसरून वयोवृद्ध वारकरी देखील तरुणांसारखे धावताना तुम्हाला फक्त या वारीच्या रिंगणातच पाहायला मिळतात.
पुढे स्लाईडसच्या माध्यमातून पाहा, पालखी सोहळ्य़ातील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...