आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बा विठ्ठला भिजव रे सारे रान- वारक-यांची आर्त हाक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघड असा दिवे घाट पार करताना... - Divya Marathi
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघड असा दिवे घाट पार करताना...
पुणे- विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्णहरी.. असा जयघोष करत माउली आणि तुकोबांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तुकोबांच्या पालखीने हडपसर- लोणी काळभोरहून यवत-उरळी कांचनकडे तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे सरकली आहे. त्याआधी रविवारी दोन्ही पालख्या दोन दिवसाचा मुक्काम ठोकून पुण्यातून बाहेर पडल्या.
माउलींच्या पालखीने रविवारी सकाळी दिवे घाटाचे अवघड चढण पार करतसासवडला मुक्काम ठोकला होता. आज सकाळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवतकडे मार्गस्थ झाला. दुपारचा विसावा उरुळी कांचन येथे होईल. तर माऊलींची पालखी आज मल्हाराच्या घरी म्हणजेच जेजूरीत मुक्कामाला थांबेल. दरम्यान, पावसाने अद्याप हुलकावणी दिल्याने वारकरी अभाळाकडे डोळे लावून बा विठ्ठला भिजव रे सारे रान म्हणून आर्त हाक देत आहे.
तुकोबांची पालखी पुण्यातील नाना पेठेतील मुक्कामाहून सकाळी साडेसहाच्या सुमारास निघाली. त्याचवेळी भवानी पेठेत मुक्कामास असणारी माउलींची पालखीही मार्गस्थ झाली. हडपसरपर्यंत दोन्ही पालख्यांची एकत्रित वाटचाल झाली. दोन्ही पालख्यांचे वारकरी एकत्र येताच विठुनामाचा जयघोष झाला. हडपसरला अल्पोपहार आणि विसावा झाल्यावर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
खडतर टप्पा -
आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरचा पुणे ते सासवड हा सर्वांत अवघड टप्पा मानला जातो. संपूर्ण दिवेघाट खड्या चढणीचा आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कडक उन्हात दिवे घाटाची चढण वारकऱ्यांना पार करावी लागली. त्यामुळे पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा भाविकांना सहन कराव्या लागल्या. तरीही मुखी हरिनाम घोळवत माउलींची पालखी वेळेपूर्वीच दिवेघाट पार करून पुढे निघाली.
‘पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..’

विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांनी पुण्याजवळील दिवेघाटची अवघड वाट हरिनाम घेत रविवारी सहज पार केली.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा व अनुभवा, संत ज्ञानोबा व संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...