आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ग्यानबा-तुकोबांच्या जयघोषात माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यनगरीत पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी टाळ-मृदंगाच्या आणि ग्यानबा-तुकोबांच्या जयघोषात आज (शुक्रवारी) सकाळी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पाललीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. पुणेकरांना भक्तिमय वातावरणात ग्यानबा- तुकोबांना निरोप दिला.

पुण्याकडे येत असताना बुधवारी माऊलींच्या पालखी रथाचे चाक दिघी येथे पंक्चर झाले होते. परिणामी प्रस्थान सोहळ्यास उशीर झाला होता. माऊलींच्या पालखीचे तुकोबांच्या पालखीनंतर तब्बल तीन तासांनी पुण्यात आगमन झाले. फुलाने सजलेली आणि विद्यूत रोशनाई नटलेल्या माऊलींच्या पालखीचे रात्रीच्या वेळी आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी अालोट गर्दी केली होती.

महापौर प्रशांत जगताप आणि खासदार अनिल शिरोळे यांनी पालखीचे स्वागत केले. दोन्ही पालख्या बुधवार आणि गुरुवारी मुक्‍काम केल्यानंतर शुक्रवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने निघल्या.

बाल वारकर्‍यांनी वेधले लक्ष...
कपाळावर चंदणाचा टीळा, गळ्यात तुळशी माळ घातलेल्या बाल वारकर्‍यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, पालखी व भाविकांचे फोटो..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...