आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अशा’ कलाकारांवर बहिष्कार टाकावा : पं. राजन, साजन मिश्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘जे पाकिस्तानी कलाकार इथे येऊन कमाई करतात, नाव मिळवतात, सन्मान प्राप्त करतात, तेच कलाकार तिकडे गेल्यावर इथल्या दहशतवादी कारवायांविषयी निषेधाचा चकार शब्दही काढत नाहीत. अशा कलाकारांवर रसिकांनी तर बहिष्कार टाकावाच. केंद्र सरकारनेही असे कलाकार बॅन करावेत’, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक पं. राजन व पं. साजन मिश्रा यांनी नाव न घेता पाकिस्तानी कलाकारांवर टीकास्र सोडले.

मिश्रा बंधू म्हणाले,‘कधीकाळी लाहोर, इस्लामाबाद कलांची माहेरघरे होती. आता तिथे कुठलेच अभिजात कार्यक्रम होत नाहीत. हा कशाचा परिणाम आहे? कलेला आणि कलाकारांना धर्म, जात, भाषा यांच्या मर्यादा नसाव्यात. पण जे कलाकार इथे येऊन सगळे लाभ मिळवतात, ते तिकडे गेल्यावर अचानक गप्प कसे होतात? त्यांना इथे होणारे हल्ले, दहशतवादाचे प्रकार दिसत नाहीत काय? तुम्ही देशाचे नाव घेऊ नका, पण दहशतवादाला कुठल्या देशाच्या लेबलची काय गरज आहे. जे अयोग्य घडत आहे, त्याचा निषेधही करण्याइतके ते असंवेदनशील आहेत काय? असे असेल तर अशा कलाकारांवर रसिकांनी तर बहिष्कार टाकावा,’ असे ते म्हणाले.

पं. साजन मिश्रा यांची षष्ट्यब्दी
बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायकद्वय पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्यापैकी पं. साजन मिश्रा यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त १५ ऑक्टोबरला मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गौरवसोहळा होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात पं. बिरजू महाराज आणि प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांचे कलाविष्कार होणार आहेत. तबलावादक पं. अरविंदकुमार आझाद यांच्या ‘तालायन’ संस्थेने या सत्कारसोहळ्याचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध गायक रूपकुमार आणि सोनाली राठोड या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...