पुणे - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठाच्या ५१ व्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजप नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. १० मे रोजी सकाळी ९.३० वाजता भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात धनकवडी येथे हा समारंभ होईल, अशी माहिती भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांनी येथे दिली.
शैक्षणिक कार्यात ठसा उमटवणा-या विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच सेवक वर्गाचा या समारंभात खास ‘सेवागौरव पुरस्कारा’ने सन्मान केला जाणार आहे. ‘नॅक’ (नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडिटेशन कौन्सिल) कडून विद्यापीठाला अ दर्जा मिळाला आहे. तसेच यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) च्या कायद्यातील ट्वेल्व्ह (१२) बी कलमानुसार मान्यताही मिळाल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
विद्यापीठ संग्रहालय : भारती विद्यापीठाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल मांडणारे एक विशेष संग्रहालय लवकरच उभारण्यात येणार आहे. भारती विद्यापीठाची स्थापना, त्यामागील उद्देशांचा यात समावेश असेल.