आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंची चिक्की अजून ‘दडवलेली’च! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’ खरेदीची चौकशी पाच सचिवांमार्फत करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र, त्यांच्याच सरकारमधील महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त चिक्की खरेदीसंदर्भातली कागदपत्रे अजूनही संकतेस्थळावर खुली करण्यात आलेली नाहीत.

आघाडी सरकारमधल्या कथित गैरव्यवहारांचा बागुलबुवा दाखवून पंकजा मुंडेंच्या चिक्कीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपच्या मंत्र्यांनी चालवल्याचे दिसून येत आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांवर चौकशीची टांगती तलवार ठेवून आगामी पावसाळी अधिवेशन पार पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांच्या काळात झालेल्या खरेदीची कितीही चौकशी झाली तरी यामुळे पंकजा मुंडे दोषमुक्त कशा होणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्री आणि स्वतः पंकजा मुंडे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. ‘कोणत्याही प्रकरणाची चौकशी करायची असेल तर ती प्रामाणिक आणि त्रयस्थ संस्थेकडून करून घेतली पाहिजे. सरकारी यंत्रणेतले सदस्य कधीही आपल्या कनिष्ठ किंवा वरिष्ठ सहका-याविरुद्ध अहवाल देण्याची किंवा कोणाला दोषी धरण्याची शक्यता नसते,’ असे कुंभार यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शासनाच्या कोणत्याही चौकशी समितीने कुठल्याच मंत्र्यांना दोषी धरलेले नाही. अनेक समित्यांनी तर अहवालही दिलेले नाहीत. यामुळेच मुनगंटीवार यांची चौकशी समितीची घोषणा फसवी असल्याची टीका होत आहे.

पुढे वाचा... पाकिटावर तारीखच नाही : सावंत