आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panshet Dam Burst Compeled 54 Years, Massive Flooding In Pune.

PHOTOS: 54 वर्षापूर्वी पानशेत धरण फुटल्याने पुण्यात माजला होता हाहाकार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 जुलै 1961 रोजी पुण्यात हाहाकार माजला होता, जो तो ओरडत पळत होता 'पाणी आलं..पाणी आलं...', घटनाच तशी होती. कारण पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती. भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळ पर्यंत थोपवून धरलं होते. पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जिवितहानी झाली असती. पण शेवटी व्हायचे तेच झाले पहाटे पहाटे पानशेत धरण शेवटी फु़टले व त्याच्या मुळे थोडया वेळाने पुढचे छोटे खडकवासला धरण फुटले होते. या घटनेत एक हजारहून अधिक लोक मुत्यूमुखी पडले होते.
पुण्यात पाणीच पाणी झालं, हाहाकार माजला, जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. यात अनेकांची वाताहात झाली. आयुष्यांची उलथापालथ झाली. कित्येकांची स्वप्नं त्या गढूळ पाण्यात ढेकळाप्रमाणं विरघळून गेली. या पुरानं एका पिढीचा कणाच मोडला. त्या दिवशी पुण्याजवळच्या पानशेत धरणाला धोका असल्याची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. बातमीत धरणाचा फोटोही छापला होता.
बातमीचा एकूण सूर असा होता की धरणाला धोका असला तरी पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये. पुणे शहराला कसलाही धोका नाही. मात्र, संकटाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. डेक्कन जलमय होऊ लागलं होतं. अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. त्या पाण्याला प्रचंड जोर होता. पाय जमिनीवर ठरत नव्हते. पाण्यासोबत प्रचंड चिखल आणि बारीक रेती येत होती. डेक्कन जिमखाना चौकाची स्थिती तर एखाद्या युद्धभूमीसारखी झाली होती. जो तो जीव वाचवण्याच्या गडबडीत होता.
कर्वे रोड आणि जंगली महाराज रोड हे नदीकाठचे महत्वाचे रस्ते केव्हाच पाण्याखाली लुप्त झाले होते. डेक्कन जिमखाना ग्राऊंडमध्ये पाणी भरुन त्याचं तळं झालं होतं. आम्ही काही लोक मिळून फर्ग्युसन कॉलेज रोडवरुन फर्ग्युसन कॉलेजच्या दिशेनं चालू लागलो होतो. इमारती डोळ्यांदेखत ढासळत होत्या. बघता बघता पाणी गुडलक चौकात आलं. पाण्याची पातळी वाढतच होती.
फर्ग्युसन कॉलेजच्या मागं असलेली हनुमान टेकडी, पर्वती माणसांनी फुलून गेली होती. हळू हळू पाणी वाढत वाढत फर्ग्युसन कॉलेजच्या मेनगेट पर्यंत आलं. जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड यांना जोडणारे सर्व रस्ते आणि गल्ल्या पाण्यानं भरुन गेल्या होत्या.
अर्धे पुणे उद्ध्वस्त झाले! त्याच्या सत्यासत्य, कल्पित-अकल्पित कहाण्या नंतर बराच काळ प्रसृत होत राहिल्या. पुणे शहराची पुनर्मांडणी करण्यासाठी स. गो. बर्वे यांच्यासारखा कर्तबगार अधिकारी नेमला गेला. त्या वेळी पुण्याबाहेर नव्या पेठेत, दत्तवाडी वगैरे भागात ‘फेकले गेलेले’ पूरग्रस्त आता पुणे महानगराच्या मध्यभागी, कोट्यवधी रुपये रकमांच्या जागांतून राहत आहेत. पानशेतचा पूर व त्यानंतर हा विषय घेऊन श्री. ना. पेंडसे यांनी नाटक लिहिले, तर शकुंतला गोगटे यांनी ‘पानशेतचा प्रलय’ नावाची सत्यकथा लिहिली.
या घटनेला आता 54 वर्षे पूर्ण झाली. पानशेत धरण फुटल्याने पुणे जलमय झाले होते. या महापुराने अनेक धडे शिकवले. त्यातला सर्वात मोठा धडा म्हणजे संकटांनी खचून जाऊ नका. त्याच्याशी मुकाबला करायला शिका. पुण्याने हा धडा उत्तमरित्या गिरवला. त्यामुळे पुणे शहर फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले. नुसतंच उभं राहिलं नाही तर चौफेर प्रगती करत आज जगातले प्रमुख औद्योगीक शहर बनले आहे.
चला तर पाहूया छायाचित्रांच्या माध्यमातीतून, 54 वर्षापूर्वी पुण्यात पानशेत पुराने माजवलेला हाहाकार...