आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ अाठ पुणेकरांपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘पंतप्रधान आवास योजने’चा लाभ (पीएमएवाय) थेट लाभार्थींच्या कर्जखात्यात जमा होण्याचा अनुभव पुण्यातील आठ ग्राहकांना आला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ‘पंतप्रधान आवास योजनेशी’ निगडित सीएलएसएस (कर्जाशी निगडित अनुदान योजना) जाहीर केली होती. या योजनेची मधुर फळे गरजू लाभार्थींपर्यंत एका वर्षाच्या आतच थेट पोहोचली आहेत. या योजनेअंतर्गत पुण्यातील ‘आनंदग्राम’ प्रकल्पात घर घेतलेल्या आठ ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंतचे व्याजाचे अनुदान मिळाले आहे. या लाभार्थींमध्ये रिक्षा ड्रायव्हर, भाजी विक्रेते, फॅब्रिकेशन युनिटवाले अशा गरजूंचा समावेश आहे. पाशा शेख आणि चंद्रकांत बाबर या दोन लाभार्थींनी घर घेतल्यनातंर त्यांना अाठ महिन्यात सुमारे सव्वादोन लाखांचे अनुदान मिळाले आहे.
काय आहे योजना
वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी आहे, अशा गृह कर्जदारांना कर्जावरील व्याजासाठी अनुदान मिळू शकते. यासाठी नवीन घराचे चटईक्षेत्र ६० चौरस फुटांपेक्षा कमी असावे. खरेदीदार किंवा त्याच्या कुटुंबातील अविवाहित प्रौढ सदस्याच्या मालकीचे पूर्वीचे कोणतेही घर असता कामा नये.