आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parajumper Sheetal Mahajan Jump From 10 K Feet Height Of Sky

पॅराजंपर शीतल महाजनकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आंतरराष्ट्रीय दर्जाची स्कायडायव्हर आणि पॅराजंपर शीतल महाजन हिने पॅरॉशूटच्या साहाय्याने 10 हजार फुट ऊंचीवरून उडी मारत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे ताशी 220 किलोमीटर वेगाने जमिनीकडे झेपावणा-या शीतलने त्यावेळी पवारांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड हातात धरले होते.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीत सध्या महाराष्ट्रातील पहिला स्कायडायव्हिंग (पॅराशूट जंपिंग) फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलदरम्यानच पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा निर्धार शीतलने व्यक्त केला होता व तो पूर्ण केला. बुधवारपासून सुरु झालेला हा फेस्टिव्हल रविवारपर्यंत चालणाप आहे. या फेस्टिव्हलमध्ये पॅराशूट जंपिंगचे शिबीरही आयोजित करण्यात आले होते. याचबरोबर स्टॅटिक लाइन (सोलो जंप), टॅण्डम जंप आणि ऍक्सलरेटेड फ्री फॉल जंप आदी प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबीरात सहभागी झालेल्या युवा- युवतींसह उत्साही व्यक्तींना स्वत: शीतल महाजन मार्गदर्शन करीत आहे. याचदरम्यान शीतलने 'टॅण्डम जंप' या क्रीडा प्रकारातून विमानातून 10 हजार फुटांवरून उडी मारली. नौदलातून रिटायर झालेले मोहन राव आणि एअर फोर्समधून रिटायर झालेले आनंद पाठक यांचीही साथ तिला लाभली. पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उड्या घेऊन शीतल महाजनच्या विक्रमी आभाळउडीचे चित्रीकरण राव व पाठक यांनी केले.
पुढे वाचा, या उपक्रमाबाबत शीतलचे काय म्हणणे आहे आणि
कोणत्या कवयित्रीचा पणती आहे शीतल