आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पाचवर्षीय बालकास पालकाची अमानुष मारहाण,शरीरावर चटके देऊन काठीने बदडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लोहगाव परिसरात राहणा-या एका कुटुंबातील पाचवर्षीय मुलगा चड्डीतच प्रात:विधी करतो या कारणास्तव वडील व सावत्र आईने त्याला बांधून ठेवून अमानुष मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. या मुलाच्या शरीरावर चटके देऊन त्याला काठीने बेदम मारहाण केली. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी सावत्र आई मंजू गुप्ताला अटक केली तर पिता विजय गुप्ता फरार झाला आहे.
गोलू असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते सचिन शिवाजी खांदवे यांनी विमानतळ पोलिस चौकीत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुप्ता दांपत्यावर भादंवि 324, 326 व 342 कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुप्ता यांच्या शेजारी राहणारी महिला दीपा विशाल ओव्हाळ यांनी सचिन खांदवे यांना फोन करून मारहाणीची माहिती दिली होती. त्यानंतर खांदवे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घरात गोलू मोठ्याने रडत होता. त्याचे पूर्ण शरीर लाल झालेले होते. चेहरा सुजलेला होता. तळहाताला चटके दिल्याच्या ताज्या जखमा होत्या. पायावर अमानुष मारहाण केल्याचे व्रण दिसत होते. खांदवे व कार्यकर्त्यांनी तातडीने बालकाला
रुग्णालयात दाखल केले.