आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पर्जन्य महायंज्ञ, वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी वारक-यांची आर्त हाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पावसाने दडी मारण्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्यावाचून शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत. परिणामी शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. हे संकट दूर करण्यासाठी पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांनी पर्जन्य महायंज्ञाचे आयोजन केले होते. हा महायंज्ञ लक्ष्मीमाता मंदिर, शिवदर्शन पुणे येथे सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाला.
या महायंज्ञात बीड, बारामती, परळी वैजनाथ, करमाळा, वेल्हा आणि राज्यातील विविध भागातून आलेल्या दोन हजार शेतकरी वारक-यांनी सहभाग घेतला. यावेळी वारकरी बांधवांनी विठूरायास संपूर्ण महाराष्ट्रात लवकरात लवकर पाऊस पडण्यासाठी साकडे घातले. यावेळी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.