आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायएनएस शिवाजीत पासिंग अाऊट परेड जल्लाेषात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय नाैदलातील अधिकाऱ्यांसाठी मरीन इंजिनिअरिंगचे तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या लाेणावळ्यातील ‘अायएनएस शिवाजी’त २४ व्या तुकडीची पासिंग अाऊट परेड जल्लाेषात झाली. यात १५३ नाैदल अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांत २५ परदेशी प्रशिक्षणार्थींचा समावेश अाहे. कमांडर के. पी. अरविंदन, स्टेशन कमांडर लाेणावळा अाणि कमांडिंग अाॅफिसर अायएनएस शिवाजी यांनी पासिंग अाऊट परेडची पाहणी करत प्रशिक्षणार्थींकडून मानवंदनेचा स्वीकार केला. पी. के. साहू या प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणादरम्यान सर्वाेत्तम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. उत्कर्ष भारद्वाज याने उत्कृष्ट खेळाडू तसेच कमांडर राेलिंग ट्रॉफीचा बहुमान मिळवला, तर मालदीव नाैदलाच्या अहमद माेहंमद या परदेशी प्रशिक्षणार्थीने सर्वाेत्कृष्ट परदेशी प्रशिक्षणार्थीचा किताब पटकावला.
बातम्या आणखी आहेत...