आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NDA पासआऊट परेडनंतर कॅडेट्सनी असा व्यक्त केला आनंद, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासिंग आऊट परेडनंतर विद्यार्थ्यांनी असा आनंद व्यक्त केला. - Divya Marathi
पासिंग आऊट परेडनंतर विद्यार्थ्यांनी असा आनंद व्यक्त केला.

पुणे- गुरूवारी नॅशनल डिफेंस अकादमी (एनडीए) च्या 133 व्या कोर्सचा पासिंग आऊट परेड सोहळा पार पडला. यानिमित्ताने किर्गिझिस्तानचे लष्करी अधिकारी मेजर जनरल राईमबद्री दुइशनीबीए आणि एनडीएचे कमांडंट एयर मार्शल जसजितसिंह क्लेर उपस्थित होते. त्यांनी आर्मी बॅंडच्या धूनवर परेड करत कॅडेंट्सना सलामी दिली.

 

-बटालियन कॅडेट कॅप्टन अर्जुन ठाकुर याला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. राहुल बिस्तला सिल्वर तर शशांक शेखरला कांस्य पदकाने गौरवले.  
-एनडीएच्या 133 व्या बटालियनमध्ये एकून 250 कॅडेट्स पास आउट झाले. ज्यात 152 कॅडेट्स आर्मी, 27 कॅडेट्स नेवी आणि 71 कॅडेट्स एयरफोर्स विभागाचे होते. तर, 14 कॅडेट्स मित्र देशांतील होते. 

 

कॅडेट्सने शेयर केले अनुभव-

 

-अर्जुन ठाकुरने सांगितले की, भारतीय लष्करात भरती होणे हे माझे स्वप्न आज पूर्ण होत आहे. यापुढे देशसेवेसाठी कठोर मेहनत करण्याची तयारी आहे.
-तीन वर्षाच खूप काही शिकायला मिळाले. सुवर्ण पदक मिळाल्याचा अभिमान वाटतो. यात एनडीएतील शिक्षक आणि माता-पिता यांचे योगदान आहे. 
-राहुल बिस्त म्हणाला, माझे पिता लष्करातील पॅरा रेजिमेंटमध्ये देशाची सेवा करतात. त्यांचा वारसा पुढे नेत असल्याचा आनंद आहे.
-शशांक शेखर म्हणाला, लहानपणापासून लष्करात भरती होण्याचे माझे स्वप्न होते. शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करत राहणार.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एनडीए पासिंग आऊट परेडचे फोटोज......

बातम्या आणखी आहेत...