आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passport Fraud: Police File Chargesheet Against Hasan Ali

जुन्या गाड्यांचा भंगार विकता-विकता अब्जाधिश बनला हसन अली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मनी लॉंड्रिंग आणि कोट्यवधींचा कर बुडव्या हसन अली खान विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात लवकरच कोर्टात सुनावणी सुरु केली जाणार आहे.

पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी खोटी माहिती दिल्याचाही ठपका हसन अलीवर ठेवण्यात आला आहे. हसन अली सध्या मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगाची हवा खात आहे. पुण्यातील पासपोर्ट विभागाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्‍यात डिसेंबर 2011 मध्ये हसन अलीविरुद्ध पासपोर्ट नुतनीकरणात खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मार्च महिन्यात चतु:श्रृंगी पोलिसांनी हसन अलीची एक दिवसाचा पोलिस रिमांड घेऊन कसून चौकशीही केली होती. हसन अलीचे हस्ताक्षराचेही नमुने यावेळी घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात 40 पानांचे आरोपपत्र जिल्हा दंडाधिकारी कोर्टात सादर केले होते.

चौकशी अधिकारी सुभाष निकम यांनी सांगितले की, हसन अली विरोधात कोर्टात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रासोबत साक्षीदाराचे जबाब आणि पुरावेही देण्यात आले आहे. एफआयआरमध्ये अलीविरोधात भादंविनुसार 420 (फसवणूक), 467 (कट रचने) आणि 10 (3) तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम 12 (1) नुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. हसन अली खानने एक पासपोर्ट त्याच्या हैदराबाद येथील बंजारा हिल्स स्थित बंगल्याच्या पत्त्यावर 2004 मध्ये लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांकडून मंजूर केले होता. परंतु हसन अलीचा हैदराबादेतील बंगल्याचा काही संबंध नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. हसन अली याने पासपोर्ट विभागाला खोटी माहिती दिल्याचेही समोर आले होते.

हसन अली याने पास पासपोर्ट क्रमांक A9884318 सन 2000 मध्ये हैदराबाद पासपोर्ट कार्यालयातून बनवला होता. याच पासपोर्टच्या आधारे तो लंडन येथे गेला होता. परंतु तेथे त्याचा पासपोर्ट गहाळ झाल्यानंतर त्याने भारतीय उच्चायुक्ताकडे 2004 मध्ये पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी अर्ज केला होता.

हसन अली कबाडी ते अब्जाधिश कसा बनला? हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर...