आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patangrao Kadam Said Shivsena And BJP Will Be Separate Soon

सेना-भाजपचा संसार जास्त टिकणार नाही, पतंगराव कदमांचे भाकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काेल्हापूर व कल्याण-डाेंबिवली महापालिकांच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली अतिटाेकाची भूमिका पाहता राज्यात भाजप-शिवसेनेचा ‘संसार’ जास्त दिवस टिकणार नाही. तसेच महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण पाहता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेसाठी एकमेकांशी जवळीक साधतील, असे वाटत नसल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांनी गुरुवारी व्यक्त केले.

कदम म्हणाले, भाजपसाेबत राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधली तरी राज्यातील वातावरण पाहता ही युती टिकणे शक्य नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येही सत्तेवर असताना मतभेद हाेते, धुसफूस हाेती. मात्र, ती कधी चव्हाट्यावर आली नाही. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे अाघाडी सरकार राष्ट्रवादीने पाडले. त्याच वेळी मी सांगितले हाेते की, राज्यात दाेघांपैकी काेणाचीही एकहाती सत्ता येणार नाही.

चव्हाणांना तिकीट देऊन चूक
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला ितकीट देऊन माेठी चूक झाली. त्यामुळे दोघेही अापापल्या मतदारसंघात अडकून पडले व उर्वरित उमेदवारांसाठी त्यांना वेळ देता अाला नाही. निवडणुकीत बाहेरून नेते अाले तर त्याचा प्रभाव पडताे, असेही कदम यांनी नमूद केले.

पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकीकडे भाजप सरकारविराेधात अांदाेलने करतात अाणि बारामतीत भाजप नेत्यांना बाेलावतात याबाबत विचारले असता कदम म्हणाले, ‘पवारांच्या काय गमती-जमती चालल्या अाहेत, त्यांच्या मनात काय अाहे याबाबत त्यांच्या कुटुंबालाही माहिती नसते, असा चिमटाही त्यांनी काढला.