आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patangrao Kadam Talk On Suspended Mp Suresh Kalmadi

माझे मोजमाप करणे लुंग्यासुंग्याचे काम नाही- पतंगराव कदमांचा कलमाडींना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपण लहान-सहान गोष्टीत रस घेत नाही तसेच 'चिफ' राजकारणही करत नाही. सध्या आपण शांत असून, 'थांबा आणि पहा' हेच धोरण स्वीकारले आहे. मात्र आपले मोजमाप करणे कोणा लुंग्यासुंग्याचे काम नाही, अशी सडकून टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर नाव न घेता केली.
पतंगराव कदम पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
पुण्याचे काँग्रेसचे खासदार असलेले सुरेश कलमाडी सध्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरून पक्षातून निलंबित आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत मोठा भ्रष्ट्राचार केल्याने तुरुंगात जाण्याची नामुष्की कलमाडी यांच्यावर आली. काँग्रेस पक्षाने सध्या पक्षात साफसफाईची मोहिम सुरु केली आहे. त्यातच पक्षाची धुरा युवा नेते व पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे पक्षात डागाळलेल्या नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे पुण्यातून भ्रष्टाचाराचा ठपका बसलेल्या कलमाडींना तिकीट मिळणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे पुण्यातील खासदारकीचे तिकिट पुण्यात भारती विद्यापीठ या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून ब-यापैकी जम बसवलेल्या पतंगराव कदम यांच्या मुलाला म्हणजेच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना देण्याची मागणी सुरु आहे. विश्वजित कदम यांनी तयारीही सुरु केली आहे. काँग्रेस पक्षात युवकांना स्थान देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे विश्वजितने पुण्यातून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी दिल्ली पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा संदर्भ घेत कलमाडी यांनी पतंगराव कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
पुढे वाचा, कलमाडी काय म्हणाले होते पतंगराव कदमांना...