आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मूतखड्याची शस्त्रक्रिया करताना रुग्णाची किडनी काढल्याचा प्रकार पुण्यातील प्राइम रुग्णालयात घडला. त्यानंतर उपचारादरम्यान, रुग्णाचा मृत्यू झाला. इंद्रजित तुकाराम चव्हाण असे मृताचे नाव आहे. त्यांचे भाऊ विश्वजित यांनी प्राइम हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अद्याप कोणत्याही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

इंद्रजित सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी त्याला प्राइम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण शस्त्रक्रियेनंतर इंद्रजितच्या छातीमध्ये दुखू लागले. हृदयविकार सेवा नसल्याने त्याला दीनानाथ रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. तेव्हा प्राइमच्या डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया सुरू केली. पण याचदरम्यान इंद्रजितचा मृत्यू झाला.