आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवनानगर-आपटी पूल वाहून गेला, महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता दरीत कोसळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/सातारा- येथून जवळ असलेल्या मावळ तालुक्यातील पवनानगरकडून आपटी आणि गेवेंडे या गावांकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेला. ओढ्यावर हा पूल बांधण्यात आला होता. महाड सारखी ही घटना असली तरी पाण्याचा प्रवाह लहान असल्याने आणि सुदैवाने त्यात कोणतीही वाहने न पडल्याने जीवित हानी टळली आहे. पण यामुळे आपटी आणि गेवेंडे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. दुसरीकडे महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील एका भागातील रस्ता खोल दरीत कोसळला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मावळ तालु्क्यातील पूल वाहून गेल्याने या परिसरात आलेले पर्यटक अडकून पडले आहेत. आता या जागी तात्पूरता पूल उभा केला जाईल. त्यानंतर पक्क पूल बांधला जाईल, असे मावळचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दोन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पवना धरणाच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. जवळच्या गावांना संतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाबळेश्वर-पोलादपूर घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. या रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या दरम्यान काल या रस्त्याचा काही भाग दरीत कोसळल्याने वाहतुक बंद करावी लागली. पण कोसळलेला भाग मोठा असल्याने वाहतूक सुरु होण्यासाठी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईडवर बघा... महाबळेश्वर-पोलादपूर घाट परिसरातील रस्ता ठिकठिकाणी कसा दरीत कोसळले आहेत....मावळ तालु्क्यातील पूल असा वाहून गेला आहे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...