आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pawana Closed Water Pipeline Project Should Be Cancelled Farmers Demand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दच करावा,शेतकर्‍यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेली नियोजित पवना बंद जलवाहिनी योजना पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी मावळातील शेतकर्‍यांनी शुक्रवारी केली. या प्रश्नी दोन वर्षांपूर्वी रास्ता रोको आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता, यात तिघांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी भाजप, शिवसेना, रिपाइं व इतर संघटनांच्या वतीने येळसे येथे एका सभेत मृत शेतकर्‍यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी आमदार नीलम गोर्‍हे, आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी आमदार रूपलेखा ढोरे आदी उपस्थित होते. आंदोलनात मृत्युमुखी पडलेले शेतकरी शामराव तुपे, कांताबाई ठाकर व मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अहवाल मांडलाच नाही
आमदार गोर्‍हे म्हणाल्या, शेतकर्‍यांचा विरोध असूनही शासनाने बळजबरीने प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. चौकशीसाठी नेमलेल्या माजी न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांनी अहवाल सादर करूनही शासनाने अद्याप तो उघड केलेला नाही. हा अहवाल विधानसभेच्या पटलावर मांडण्यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

कर्णिकांची ‘नार्को’ करा
आमदार संजय भेगडे म्हणाले, शासनाने हा प्रकल्प रद्द करावा तसेच शेतकर्‍यांवरील खटले मागे घ्यावेत. मृत शेतकर्‍यांच्या वारसांचे पुनर्वसन करावे. तसेच गोळीबाराचा आदेश देणार्‍या मंत्र्यांचे नाव समजण्यासाठी शासनाने तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांची नार्को चाचणी करण्याची मागणी त्यांनी केली.