आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड पालिका: राष्ट्रवादीच्या \'बाय\'ने शिवसेनेचे राम पात्रे विजयी, भाजपला शह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे उमेदवार राम पात्रे विजयी होताच खासदार श्रीरंग बारणे आणि राहुल कलाटे यांनी विजय असा साजरा केला. - Divya Marathi
शिवसेनेचे उमेदवार राम पात्रे विजयी होताच खासदार श्रीरंग बारणे आणि राहुल कलाटे यांनी विजय असा साजरा केला.
पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यानगरमधील प्रभाग क्र.8 अ च्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बेरजेचे राजकारण भाजपला शह देण्यात यश मिळवले. रविवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राम पात्रे यांनी 1379 मतांनी दणदणीत विजय मिळविला. शिवसेनेच्या पात्रे यांना राष्ट्रवादीने उघड मदत केल्याचे पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आल्याने ही पोटनिवडणूक झाली.
राम पात्रे यांना 2402 मते, काँग्रेसच्या सतीश भोसले यांना 1023 मते, भाजपच्या भीमा बोबडे यांना 959 मते तर राष्ट्रवादीच्या दत्तू मोरे यांना केवळ 580 मते मिळाली. राष्ट्रवादीचे दत्तू मोरे आणि शिवसेनेचे राम पात्रे मामा-भाचे आहेत. मामाला दहा महिन्यासाठी नगरसेवक करायचे व फेब्रुवारी 2017 मध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीत मामाने भाच्याला मदत करायची असा अलिखित करार झाला आहे. यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांत अंडरस्टॅंडिग झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उघड दिलेल्या 'बाय'मुळे विद्यानगर प्रभागात प्रथमच धुनष्यबानाने बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी- शिवसेनेत 'मिच्यूअल अंडरस्टॅंडिग', लक्ष्मण जगताप रडारवर
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेनेत उघड समझोता झाला होता. मोरे आणि पात्रे हे मामा-भाचे आहेत. आता भाच्याने मामाला मदत करायची व नंतर मामाने भाच्याला मदत करायची असा राजकीय सौदा ठरला. हा सौदा शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यात झाला. भाजपला कोणतेही संधी द्यायची नाही या हेतूने हा सौदा झाला. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात भाजप विरूद्ध इतर सगळे पक्ष अशी स्थिती आहे. त्यातच भाजपने लक्ष्मण जगताप यांना शहराध्यक्ष केल्याने त्यांचे कट्टर विरोधक खासदार श्रीरंग बारणे आणि आझम पानसरे यांनी भाजपला आगामी काळातसुद्धा चांगलाच धोबीपछाड देण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच विद्यानगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात उघड समझोता झाला. शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली. बाबर आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात जवळीक आहे. त्यामुळे बाबर यांचे कट्टर विरोधक खासदार बारणे यांनी यासाठी रणनिती आखली. याला पानसरे व बहल-शेट्टींनी साथ दिली. या रणनितीनुसार राम पात्रे यांनी सहज विजय मिळविला. तेथे काहीही ताकद नसलेली काँग्रेस दुस-या स्थानावर राहिली यावरून काय ते समजावे. भाजपला शह देण्यासाठी खासकरून आमदार लक्ष्मण जगताप यांची ताकद वाढू न देण्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये होणा-या सर्व जागांसाठी होणा-या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी व शिवसेनेत 'मिच्यूअल अंडरस्टॅंडिग' झाले तर नवल वाटू नये अशी स्थिती आहे. या पोट निवडणुकीच्या निकालाने शिवसेना व राष्ट्रवादीच्या रडारवर लक्ष्मण जगताप हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे वाचा व पाहा, कोणाला किती मते मिळाली...