आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेंच अभयारण्यात वाघांसोबत हाेणार आकाशदर्शनही, अॅस्ट्रोनॉमी टुरिझमचा प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अभयारण्यात जाणाऱ्यांपैकी ९५ टक्के पर्यटकांना आस असते ती व्याघ्रदर्शनाची. पण अभयारण्यातील सफारींच्या वेळा, मार्ग ठरलेले असतात. नेमक्या त्याच वेळी वाघ दिसणे, हा नशिबाचाच भाग असतो. सायंकाळी पाचनंतर सफारी बंद केल्या जातात. त्यामुळे जंगलातील रिझॉर्टसमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची संध्याकाळ माहितीपूर्ण मनोरंजक बनवण्यासाठी पेंच राष्ट्रीय अभयारण्यात लवकरच अस्ट्रोनॉमी टुरिझम (आकाशदर्शन पर्यटन) हा अभिनव प्रयोग सुरू होणार आहे.
राष्ट्रीय उद्याने अभयारण्यात विशेषत: व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या ठिकाणी हे आकाशदर्शन पर्यटन सध्या ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंच अभयारण्यात टेलिस्कोपची उभारणी करण्यात येत आहे. जंगलात राहणारे पर्यटक या नव्या प्रयोगाला कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता सध्या वनविभागातील अधिकाऱ्यांमध्ये आहे.

आकाशदर्शनचका? : जंगलातप्रदूषणरहित वातावरण असते. त्यामुळे आकाश स्वच्छ असते. धूर, धूळ, उत्सर्जित वायू, वाहनांतून होणारे प्रदूषण, अन्य सर्व प्रकारचे कृत्रिम गोंगाट यांचा जंगलात मागमूसही नसतो. त्यामुळे आकाशनिरीक्षणासाठी आदर्श वातावरण असते. शिवाय जंगलात नीरव शांतता मिळते. इतर नेटवर्कसचा अडथळा नसतो. तसेच जंगलात मिट्ट काळोख असतो. जो शहरात वा गावात कधीच नसतो. हे मुद्दे आकाशनिरीक्षणासाठी अनुकूल आहेत.

असा आहे टेलिस्कोप
-१०इंच न्यूटोनियन रिफ्लेक्टर
-टेलिस्कोप हाताळण्यासाठी व्यक्तीची वा एखाद्या बाह्य उपकरणाची गरज नाही
-फक्त कमांड देऊन टेलिस्कोप त्यानुसार आज्ञा ग्रहण करतो

पर्यटकांना हवी असते अॅक्टिव्हिटी
जंगलातयेणाऱ्या पर्यटकांना सफारीची वेळ संपल्यावर रात्रीपर्यंतचा वेळ त्यांना मोकळा असतो, त्या माेकळ्या वेळेत त्यांना ‘अॅक्टिव्हिटी’ हवी असते. त्यामुळे ही आकाशदर्शनाची कल्पना सुचली. तिचा पाठपुरावा करून आता ती पायलट प्रोजेक्टपर्यंत पोचली आहे. श्रीनिवासरेड्डी, फिल्ड डायरेक्टर, पेंच व्याघ्रप्रकल्प

आकाश निरीक्षण सुलभ
अभयारण्यांचेस्थान प्रदूषणमुक्त असल्याने आकाशनिरीक्षण सुलभ होईल. तसेच मिट्ट काळोख असल्याने एरवी फिकट दिसणारे तारकापुंज, आकाशगंगा, नक्षत्रे स्पष्ट दिसू शकतील. हौशी छायाचित्रकारांना आता या अभयारण्यात हौशी आकाशनिरीक्षक बनण्याचीही संधी मिळणार अाहे. समीरदुरडे, हौशी आकाशनिरीक्षक