आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी मुख्यमंत्री व्हावे ही जनभावना आनंद देणारी- पंकजा मुंडेंचा पुण्यात पुनरूच्चार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मी मुख्यमंत्री होईन की नाही, हे माहिती नाही; मंत्री राहीन की नाही हे ही सांगता येणार नाही. आता काँग्रेसच्या खासदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षातील लोकही जेव्हा असे बोलू लागतात तेव्हा विशेष आनंद वाटतो. राज्यातील लोकांना मीच मुख्यमंत्री व्हावे असे वाटते व त्यांच्या मनात मी आजही मुख्यमंत्रीच आहे, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी पुण्यात बोलताना केले.
भारती विद्यापीठाच्या 51 व्या वर्धापन दिन सोहळ्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचा-यांचा सत्कार पंकजा यांच्या हस्ते झाला. या वेळी काँग्रेसचे खासदार राजीव सातव, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम, शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
मराठवाड्यातील आमच्या भगिनी पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, असे मत खासदार सातव यांनी आपल्या छोट्याशा भाषणात व्यक्त केले. हा धागा पकडत पंकजा म्हणाल्या, मी जेथे जेथे जाते तेथील लोक साहेबांची (गोपीनाथ मुंडे) आठवण काढतात. आज गोपीनाथ मुंडे आपल्यात असते तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. ते कधीही मुख्यमंत्री बनू शकले नाहीत मात्र लोकांच्या मनात आजही तेच मुख्यमंत्री आहेत. हीच जनता माझ्याकडे आता गोपीनाथ मुंडे म्हणून पाहते. त्यामुळे जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री होण्याचे गणित पक्के झाल्याचे त्यांचा प्रतिसाद पाहून कळते. आता तर काँग्रेसचे खासदारच मी मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा देत आहेत. जनतेपाठोपाठ विरोधी पक्षालाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते हे पाहून विशेष आनंद वाटतो, असे सांगत पंकजा यांनी आपण आजही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत असे संकेत दिले.
बातम्या आणखी आहेत...