आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peoples' Representatives Ideal Villages Become Literate

लाेकप्रतिनिधींची अादर्श गावे हाेणार संपूर्ण साक्षर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी आदर्श ग्राम योजना सुरू केली. त्यात आता राज्याच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या गावात साक्षरता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा करून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आदर्श ग्राम योजनेत बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगाेली, गडचिराेली, लातूर, गाेंदिया, नंदुरबार, नांदेड, जालना जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या ११ आदर्श गावांत प्रायोगिक तत्त्वावर ही साक्षरता मोहीम राबवली जात आहे. या गावांतील ४,१३९ निरक्षरांपैकी ४,०४१ जणांनी मूलभूत साक्षरता परीक्षा देऊन प्रौढ साक्षरता सिद्ध केली आहे. ही योजना आॅगस्टपासून राज्यभरात ती राबवण्यात येणार आहे. लोकसभा व राज्यसभेचे खासदार, विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत ही याेजना राबवली जाईल. वकील, डाॅक्टर, सामाजिक वनीकरण, कृषी खात्याचे अधिकारी गावांत जाऊन मार्गदर्शन करतील. तसेच या गावांत हुंडाबंदी, दारुबंदी, कुऱ्हाड बंदी, कायदा, पर्यावरणाविषयी जनजागृतीची ठोस अंमलबजावणी हाेण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार अाहे.

नवसाक्षरात महिला लक्षणीय : २०११च्या जनगणनेनुसार राज्यात साक्षरतेचे प्रमाण ८२.९१% असून त्यात पुरुष ८९.८२, तर महिलांचे प्रमाण ७५.४८ टक्के अाहे. या टक्केवारीनुसार महिला निरक्षरांची संख्या अधिक दिसत असली तरी प्रौढ साक्षरतेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. साक्षर भारत योजनेत नुकतीच राज्यातील दहा जिल्ह्यांत २ लाख ४० हजार ७५६ जणांनी मूलभूत परीक्षा दिली आहे.

तिसरी ते आठवी समकक्ष कोर्स
यंदापासून शाळा सोडलेल्या प्रौढांना औपचारिक शिक्षण घेण्यासाठी तिसरी, पाचवी, आठवीच्या समकक्ष अभ्यासक्रम शिकवून परीक्षा घेतल्या जातील. तिसरीसाठी दहा हजार, पाचवीसाठी पाच हजार, तर आठवीसाठी तीन हजार जणांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.