आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या वडिलांना होते चित्रपटाचे वेड; व्ही.शांताराम यांच्या स्टूडिओमध्ये केली होती नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्‍यांच्‍यावर माध्‍यमांतून, विरोधकाकडून नेहमीच कडाडून टीका होते. 

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मंडई येथील टिळक पुतळयाजवळ जनआक्रोश आंदोलन केले. सर्व विधानसभा मतदारसंघांत आंदोलन करून कार्यकर्ते टिळक पुतळा इथे एकत्र आले.

मोदींनी दिलेल्या 50 दिवसांच्या आश्वासनानंतरही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही आणि ती यायला किती वेळ लागणार, याचीही सरकारकडून कोणतीही तयारी दिसत नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी हे व्यापक जनआंदोलन करण्यात आले असल्याचे अजित पवार म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केले होते; परंतु दुर्दैवाने या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी शासनाकडून करण्यात आली नाही. देशातील कोट्यवधी नागरिकांना प्रचंड आर्थिक तणावाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर देशातील कृषी व्यवस्था मोडकळीस आली असून कष्टकरी व असंघटित कामागारांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. 
.
पुण्यात राष्ट्रवादीच्या जनआक्रोश आंदोलनच्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहेत अजित यांच्‍या वैयक्तिक आयुष्‍याविषयी...

वडिलांना होते चित्रपटाचे वेड, राजकमल स्टूडिओमध्ये केली नोकरी... 
- अजित पवारांचे वडील अनंतराव पवार हे शदर पवार यांचे बंधू.
- पवार कुटुंबातील सर्वच भांवडे उच्‍च शिक्षित आणि उच्‍चपदावर कार्यरत होते.
- त्‍या काळात उच्‍चशिक्षण घेऊनही चित्रपटाचे वेड असलेल्‍या अनंतरावांनी इतर ठिकाणी नोकरी केली व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरी केली.
- त्‍यांच्‍या या निर्णयाला पवार कुटुंबाकडून प्रोत्‍साहनच देण्‍यात आले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, या-ना त्या कारणावरुन चर्चेत राहाणारे अजित पवार यांची कौटुंबिक माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)