आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप चालकांचा संप मागे, विनोद तावडे यांची मध्यस्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यातील पेट्रोल पंपचालकांनी सोमवारी मध्यरात्रीपासून जाहीर केलेला बेमुदत बंद स्थगित केला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर बंद मागे घेत असल्याची घोषणा फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी केली.

चर्चेनंतरही आघाडी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. महायुतीचे सरकार एलबीटी रद्द करेल आणि व्हॅट करप्रणाली सुटसुटीत करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिले.

त्यामुळे संप स्थगित केला, असे लोध यांनी सांगितले. अामचे सरकार अाल्यानंतर एलबीटी रद्द केला जाईल. महायुतीचे सरकार अाल्यानंतर इतर करांबद्दलचे त्यांचे मुद्देही सोडवले जातील, असे आश्वासन तावडे यांनी दिले.