आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे - देशातील सर्वात जुना आखाडा, पाहा पहिलवानांची LIFE, असे तयार होतात मल्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हरियाणा येथे देशातील सर्वा मोठी कुस्ती स्पर्धा 21 मार्चपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला देशातील काही जुन्या आखाड्यांची ओळख करून देणार आहोत. त्यात आज आपण जाणून घेणार आहोत, पुण्यातील 233 वर्षे जुन्या चिंचेची तालीम बाबत.
देशातील सर्वात जुन्या आखाड्यात अशी आहे पहिलवानांची LIFE, असे तयार होतात मल्ल
पुणे. हरियाणा येथे देशातील सर्वा मोठी कुस्ती स्पर्धा 21 मार्चपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला देशातील काही जुन्या आखाड्यांची ओळख करून देणार आहोत. त्यात आज आपण जाणून घेणार आहोत, पुण्यातील 233 वर्षे जुन्या चिंचेची तालीम बाबत.
भारतातील कुस्ती आणि आखाड्यांना सुमारे 3000 पेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आणि परंपरा आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये कुस्तीला एक वेगळे महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि पुण्यात तर कुस्ती आणि कुस्त्यांच्या तालमींचा एक मोठा इतिहास आहे. पुण्यातील अशाच एका जुन्या तालमींपैकी एक आहे चिंचेची तालीम.
अतुल प्रसाद नावाच्या फोटोग्राफरने एक फोटो सिरीज तयार केली आहे. त्यामध्ये फोटोंच्या माध्यमातून तालमीचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्कृष्ट फोटोग्राफी आणि तालमीबाबत ऐतिहासिक माहिती त्यांनी दिली आहे.

शुक्रवार पेठेतील तालीम
- पुण्यातील शुक्रवार पेठेत असलेली चिंचेची तालीम या तालमीचा इतिहास या माध्यमातून सांगण्यात आला आहे.
- भारतातील सर्वात जुन्या आखाड्यांपैकी एक आखाडा म्हणून चिंचेती तालीम ओळखली जाते.
- 1783 मध्ये चिंचेची तालीमची स्थापना झाली होती.
- पुण्यातील प्रतिष्ठीत तालमींपैकी एक अशी ही तालीम आहे.
- फेसबूकवर टाईमस्केप फोटोग्राफी पेजवर ही फोटोस्टोरी सादर करण्यात आली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तालमींचे फोटो आणि त्याद्वारे जाणून घेऊयात हा समृद्ध इतिहास...
बातम्या आणखी आहेत...