आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात ज्योतिषाच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - श्री आगस्त नाडी शिव ज्योतिष निलायम या संस्थेद्वारे ज्योतिष सांगणार्‍या कुप्पास्वामी ऊर्फ मलन गोवर राममूर्ती याने असहाय महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. आरोपीला अटक करून त्याच्या संस्थेची चौकशी करावी, अशी मागणी 29 वर्षीय पीडित महिला योगिता (नाव बदलले आहे) व शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
पीडित महिला म्हणाली, कौटुंबिक समस्या व शारीरिक आजारपणामुळे मी माहेरी राहत होते. कॅन्सरचे ऑपरेशन झाल्याने माझ्यावर अडीच लाखांचे कर्ज होते. मी 23 मार्च 2011 रोजी भविष्य बघण्यासाठी कुप्पास्वामीकडे गेले होते. त्याने मला दहा हजार रुपये महिना बोलीवर घरात घरकाम दिले. त्यानंतर एके दिवशी स्वामीने कॉफीतून गुंगीचे औषध देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केले व त्याची मोबाइलवर अश्लील क्लीपही काढली. ही क्लीप इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन त्याने माझा लैंगिक छळ करत मारहाण केली. त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी आहे. 26 ऑक्टोबर 2013 रोजी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कुप्पास्वामीला अद्याप अटक केलेली नाही.