आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनासाठी पिंपरीचे निमंत्रण ग्राह्य धरायचे का? , साहित्य महामंडळासमोर पेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे स्थळ कोणते, याविषयी साहित्य महामंडळाची समिती पेचात सापडली आहे. महामंडळाच्या घटनेनुसार निर्णय घ्यायचा झाल्यास समितीकडे फक्त सासवडचा पर्याय आहे, कारण पिंपरी-चिंचवडकरांकडून आलेले निमंत्रण नोंदणीकृत संस्थेकडून आलेले नसल्याने ते ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे आता 14 जुलैला स्थळाबाबत अंतिम निर्णय होईल.


सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड येथील लेखक-कवींच्या समूहाने दिलेले निमंत्रण महामंडळाकडे आले आहे. मात्र साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार फक्त नोंदणीकृत संस्थेकडून आलेले निमंत्रणच ग्राह्य धरले जाते. या निकषानुसार पिंपरीतून आलेले निमंत्रण अवैध ठरू शकते. त्यामुळे घाईघाईने पिंपरी-चिंचवडकरांनी मसापच्या शाखेकडून निमंत्रण सादर केले, पण आगामी निवडणुकीची आचारसंहिता त्यात अडसर ठरू शकते. त्यामुळे त्यांनी संमेलन घेण्यास ठामपणा दाखवलेला नाही. त्यामुळे अंतिम निर्णय 14 रोजीच होईल.