आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pimpri Chinchwad Municipal Corporation Encrochment

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला तळवडे येथे विरोध झाला. त्यानंतर जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी तीन नगरसेवकांना ताब्यात घेतले आहे.
मार्च २०१२ नंतरची अनधिकृत बांधकामे हटविण्याची पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई सुरु आहे. शनिवारी तळवडे येथील व्यवसयिक वापराच्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास पालिकेचे पथक गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास संतप्त जमावाने कारवाईला विरोध करत दगडफेक सुरु केली. यात अनेक बसचे नुकसान झाले. टायर जाळून रस्ता आडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तीन नगरसेवकांसह अनेकांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहिम सुरु आहे. मागील आठवड्यात दिघी येथेही अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवडमध्‍ये डांगे चौकात स्‍फोट, लहान मुलगा जखमी
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
पिंपरी परिसरात 35 चारचाकींची तोडफोड