आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीमध्‍ये शिवसेनेने जाळला पाकिस्‍तानचा झेंडा, परवेज मुशर्रफ यांचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - परवेज मुशर्रफ यांच्या शिवसेनेवर बंदी घालण्याच्या वक्तव्याचा पिंपरी-चिंचवडमध्‍ये शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून या वक्‍तव्‍याचा निषेध नोंदवला.
पाकिस्‍तानच्‍या एका वृत्‍तवाहिनीवर काही दिवसांपूर्वी परवेझ मुशर्रफ यांनी मुलाखत दिली. शिवसेना पक्षावर बंदी घालावी, असे ते म्‍हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील खंडोबामाळ चौकात पाकिस्‍तानचा झेंडा जाळला. मुशर्रफ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरूद्ध वक्‍तव्‍या केले होते. त्‍याचाही यावेळी निषेध करण्‍यात आला. शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख राहूल कलाटे, उपशहर प्रमुख विनायक रणसुभे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट यांच्‍यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्‍येने सहभागी होते.
नगरसेविका विमल जगताप, संगिता पवार, जिल्हाप्रमुख सुशिला पवार, स्वरूपा खापेकर, नगरसेवक संपत पवार, शोभा पांढकर, कलावती नाटेकर, विभाग प्रमुख सुधाकर नलावडे, विक्रम वाघमारे, विशाल गावडे, काशिनाथ नखाते, किसन राठोड, अॅड. शिवशंकर शिंदे, युवासेना सचिव दिपक भोंडवे, संतोष तरस, रोहित गावडे, राकेश वाकुर्डे, विशाल सुर्वे आदी उपस्थीत होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असा जाळला पाकिस्‍तानचा झेंडा..