आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दानशूर\' आई-वडील: अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे अवयव दान, समाजापुढे आदर्श

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेजस म्हस्के या तरुणाचे अपघातात निधन झाले. - Divya Marathi
तेजस म्हस्के या तरुणाचे अपघातात निधन झाले.
पिंपरी चिंचवड - अवयव दान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र हे दान करण्यासाठी दानत फारशी कुणामध्ये दिसत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये म्हस्के दांपत्यांनी आपल्याच ब्रेन डेड मुलाचे अवयव दान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
 
घरात दिव्यांग असल्याने जाणीव
तेजस म्हस्के या तरुणाचा 24 मे रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात तो ब्रेन डेड झाला अशी माहिती डॉक्टरांनी तेजसच्या आई-वडिलांना दिली. याचवेळी त्यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवड मधील रुपीनगर परिसरात राहणारे म्हस्के कुटुंबियांतील मुलगी तनिष्का ही अंध आहे. त्यामुळे, म्हस्के दांपत्यांना दिव्यांग व्यक्तींच्या गरजांची जाणीव होती. त्यामुळेच केवळ नेत्रदान न करता हृदय, किडनी, साधू पिंड हेही अवयव त्यांनी दान करण्याचा निर्णय घेतला. 
 
आदर्श समाजसेवक म्हस्के दांपत्य
अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली होती. घरच्यांनी तिची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यानंतर तेजसचे वडील अमित म्हस्के यांनी त्या मुलीचा सांभाळ केला. एवढेच नव्हे, तर जन्म घेणाऱ्या मुलीला सुद्धा त्यांनी दत्तक घेतले. यानंतर पीडित मुलीचे थाटात लग्नही लावले. समाजात स्थान न मिळणाऱ्या तृतीय पंथीयांना देखील अमित यांनी आसरा दिला. त्यामुळेच त्यांनी आपल्या लाडक्या तेजसचे अवयव दान करण्याचा दानशूर निर्णय  घेतला. तेजसच्या आई-वडिलांचा हा दानशूरपणा अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
बातम्या आणखी आहेत...