आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिचंवड: महापालिकेत अखेर बाळासाहेब ठाकरे, वि.दा. सावरकर यांच्या तैलचित्रांचे अनावरण..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिचंवड : काही दिवसांपासून राजकीय घडामोडीनंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण हे विनोद तावडे व गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. राजकीय अस्पृश्यता समाजात वाढू लागली आहे ही दुर्दैवाची बाब आहे असे मत गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी चिंचवड मध्ये बोलत होते.
 
बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्राचे अनावरण असल्यानं सत्ताधारी भाजपने ठाकरे कुटुंबीय अथवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला आमंत्रण देणं अपेक्षित होते. मात्र भाजपनं श्रेय लाटण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते अनावरण करण्याची घोषणा केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. मात्र ठाकरे कुटुंबियांना अथवा वरिष्ठ नेत्याला बोलावण्याची मागणी सेनेनं उशिरा केल्याच कारण भाजपने पुढे केले होते. शेवटी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर आणि शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण हे भाजपच्या नेत्यांच्या हस्ते झाले.त्यामुळे शिवसेनेच्या उपस्थित नेत्यांमध्ये नाराजी दिसली.
 
सावरकर हे आयुष्यभर अस्पृश्यतेच्या विरोधात लढले. भविष्य काळात राजकीय अस्पृश्यता बाजूला करण्याची वेळ आपल्यावर येणार आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे, तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले , मी अनेक कार्यक्रमाला जातो कोण कुठल्या पक्ष्याचा आहे याचा विचार नसतो, कारण तो त्या भागाचा त्या पक्ष्याचा नेता असतो.पण राजकीय अस्पृश्यता समाजात वाढू लागली, हे दुर्दैव आहे.बापट यांनी यावेळी ठणकाहून सांगितले.त्यामुळे आपण राजकीय अस्पृश्यता बाजूला ठेवली पाहिजे.लढाई विचारांची असू शकते व्यक्तिगत जीवनात कधीच असता कामा नये.हा आदर्श बाळासाहेब ठाकरे आणि वि.दा. सावरकर यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...